अब्दुल सत्तार म्हणतात ‘मी कुत्रा निशाणीवरही निवडून येतो !’

 

वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले एक वक्तव्य पुन्हा वादग्रस्त ठरले असून याची सोशल मीडियातून खिल्ली उडविण्यात येत आहे.

वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात बोलतांना अब्दुल सत्तार यांनी भलतेच वक्तव्य केले. ते म्हणाले की, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हाला दोन मिनिटेसुद्धा भेटत नव्हते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजतासुद्धा भेटतात, माझ्या सिल्लोड मतदारसंघात सव्वातीन लाख हिंदू मतदार आहेत तर ५० हजार मुस्लिम मतदार आहेत आणि मी मुस्लिम असूनसुद्धा गेल्या २५ वर्षांपासून निवडून येत आलो आहे. मला जर ‘कुत्रा’ निशाणीवर उभे केले तरीही मीच निवडून येतो. कारण की कुत्रासुद्धा मालकासोबत वफादार असतो !”

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसांपूर्वीच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले असून त्यावेळी उपस्थितांमधून हशा पिकला होता. मात्र आता हे वक्तव्य सोशल मीडियातून व्हायरल झाले असून त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडविली जात आहे.

Protected Content