स्थायी समितीत कुत्र्यांसह अनोखे आंदोलन ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असतांना महापालिका प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नाही म्हणून आज शिवसेनेने चक्क कुत्र्यांच्या मदतीने स्थायी समिती सभापतींना निवेदन देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिला आघाडीच्या सरीता माळी-कोल्हे यांनी आज हे अनोखे आंदोलन केले.

जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांच्या धुमाकुळ सुरू आहे. यातच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासाने कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम देखील बंद केली आहे. यामुळे आबालवृध्दांना त्रास होत असून अनेक जण चाव्याने जखमी झाले आहेत. तर काहींना प्राण देखील गमवावे लागले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज सरीता माळी-कोल्हे यांनी थेट स्थायी समितीची सभा सुरू असतांना पाळीव कुत्र्यांसह सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांना निवेदन दिले. यात त्यांनी शहरातील कुत्र्यांची समस्या सोडविण्याची मागणी दिली. विशेष म्हणजे हे निवेदन कुत्र्यांच्याच नावाने देण्यात आले होते.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरीता माळी-कोल्हे यांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांवर टीका केली. येत्या १५ दिवसांमध्ये शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांनी समस्या न सोडविल्यास आपण शहरातील पाळीव कुत्र्यांसह मोठे आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला.

खालील व्हिडीओत पहा सरीता माळी-कोल्हे यांनी केलेले अनोखे आंदोलन !

https://www.facebook.com/508992935887325/videos/211606507318235

Protected Content