फुले मार्केटमध्ये महिलेची सोनसाखळी लंपास करणाऱ्या चोरट्यास बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये कपड्यांची खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगळपोत हिसकविणाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. नागरिकांनी त्या चोरट्याचा पाठलाग करीत त्याला पकडून चांगलाच पब्लिक मार देत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवासी चित्रा देविदास पाटील (४०) या सोमवारी सकाळी वैष्णवी हिच्यासह शहरातील फुले मार्केट परिसरात लग्नाचे कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी आल्या होत्या़ खरेदी झाल्यानंतर त्या दोघीजणी फुले मार्केटसमोरून जात असताना अचानक मागून आलेल्या एकाने चित्रा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

चोरट्यास पकडून दिला चोप
चोरटा मंगळपोत चोरुन पळत असल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडून त्याचा चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चोरट्याला नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात आणल असता. चित्रा पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या चोरट्याचे नाव हेमासिंग बावरी असून तो तांबापुरातील रहिवासी आहे. याप्रकरणी चित्रा पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content