फुलगाव शिवारातील ‘तो’ अपघात नसून घातपात

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरापासून जवळ असलेल्या फुलगाव शिवारातील पिंप्री फुलगाव जुन्या मार्ग वरील एका शेतात २८ जून रोजी २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना त्याचा घातपात की अपघात या विषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने त्याचाखून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या फिर्यादिवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असन पुढील तपास स.पो.नि. आशिषकुमार आडसूळ करीत आहे.

जवळच असलेल्या फुलगाव मार्गे पिंप्री मार्गावरील अविनाश पुंडलिक पाटिल यांच्या शेतात गट क्र. २९७/१ मध्ये रस्त्या लगत पंकज रामचंद्र सोनवणे (वय २०, रा. धामणगाव ता. शहापुर जि.बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) या तरुणाचा नग्न अवस्थेत मृतदेह बुधवार २८ जून सकाळी ७ वा सुमारास पोलिसांना आढळून आला होता. त्यावेळी सदर युवकाचा घातपात झाला किंवा अपघात याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यावेळी मुक्ताईनगरचे विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सीज लॅब, श्वानपथक या यंत्रणांना पाचारण करण्यात आले होते. प्रसंगी मृतदेह पोलिसांच्या मदतीने वरणगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदना साठि दाखल केला होता त्यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्राथमिक तपासणीच्या आधारे मृत व्यक्तीचा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र रविवारी २ जुलै रोजी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर पंकज सोनवणे या युवकाचा अपघात नसुन घातपात झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी २८ जून रोजी पोलिसांनी फुलगाव येथील पोलिस पाटील रघुनाथ महाजन यांच्या फिर्यादि वरून आकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली होती. मात्र त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्याने रविवारी २ जुलै रोजी वरणगाव पोलिस स्थानकात. पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या फिर्यादि वरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास मुक्ताई नगरचे डिवायएसपी राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिस स्टेंशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ करीत आहे.

हत्त्येच्या गुन्ह्यात चार संशयीत पोलिसांच्या ताब्यात
सदर गुन्ह्याच्या तपासाकामी गुन्हे अन्वेशन विभागाच्या तपासकांच्या दृष्टीने घटनास्थळा वरील फुलगाव मधील दहा मोबाईल ट्रेस झाले त्यातील सहा मोबाईल पोलिसांनी ट्रस केले तर ते किरकोळ एक दोन शब्दापर्यंत मर्यादित होते. मात्र त्यातील चार मोबाईलची चौकशी केली असता त्यांच्यात १ तासाच्यावर संभाषण समोर आल्याने विजय सुधाकर चौधरी (वय ४०), संतोष मुरलीधर कोलते (वय ५२ ) अविनाश पुंडलिक पाटील (वय ५४ ) सुपडू उर्फ नरेंद्र यशवंत चौधरी (वय-४५, सर्व रा. फुलगाव ता. भुसावळ). यांना चौकशी करीता ताब्यात घेतले असता. आम्हीच त्याला मारल्याची कबुली दिली. सदर व्यक्ती वेडसर वृत्तीचा असतांना आपण त्याला का ? मारले असे पोलिसांनी विचारले असता संशयीतांनी सांगीतले आमच्या शेत| शिवारात भुरटे चोर मोठया प्रमाणात फिरत आहेत आमच्या शेतांमधील रात्रीच्या वेळी विहिरी वरील पाणी काढण्याच्या मोटारी, शेतात अंथरलेल्या ठिबंक नळया विजेच्या पोलवरील तार, अशा विविध वस्तू चोरून घेऊन जात आहेत. आम्हाला वाटले की हा पण चोर आहे आणि अंधारामुळे तो वेडसर आहे असा देखील अंदाज आला नाही त्यामुळे आमच्या हातून ही चुक झाल्याचे त्यांनी कबुल केले असुन सदर संशयीत आरोपींना ( ता.२ ) रात्री गुन्हे अन्वेशन विभागाच्या जळगाव पथकाने वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असुन वरणगाव ग्रामिण रुग्णांलयात तपासणी करून न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले.

Protected Content