अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराजवळील खेडी गावानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला होता. नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोकश प्रकाश खडके (वय-२८, रा. विठ्ठल पेठ, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, लोकेश खडके हा तरूण विठ्ठलपेठ परिसरात वास्तव्याला आहे. १७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील खेडी गावानजीक अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील लोकश खडके हा तरूण गंभीर जखमी झाला होता. प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला नशिक येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली आहे.

Protected Content