प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादीचा सदस्यही नाही ; कारवाई करू — ऍड रवींद्र भैया पाटील

 

 

जळगाव : प्रतिनिधी । ई डीची नोटीस आली तरी समर्थपणे उत्तर देईन असे नाथाभाऊंनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी केलेल्या भाषणातच सांगितले होते तद्वतच प्रफुल्ल लोढा हे आमच्या पक्षाचे साधे सदस्यही नाहीत त्यामुळे त्यांच्या बोलण्याची दाखल घ्यावी वाटत नाही असे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र भैया पाटील यांनी स्पष्ट केले .

ज्‍येष्‍ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दोन महिन्यापुर्वी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्‍यावेळीच नाथाभाऊंनी म्‍हटले होते की ईडीची नोटीस येणार; पण त्‍यास सक्षमपणे उत्‍तर देणार. आता ईडीची नोटीस आली असली त्‍यास नाथाभाऊ सक्षमपणे उत्‍तर देतीलच; पण जिल्‍ह्‍यात राष्‍ट्रवादी संघटीत झाल्‍याचे पाहून द्वेषापोटी हा प्रकार झाल्‍याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्‍येष्‍ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर प्रफुल्‍ल लोढा यांनी केलेले आरोप आणि त्‍यांना ईडीची नोटीस प्राप्त झाल्‍यानंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यात पाटील म्‍हणाले, की नाथाभाऊंनी राष्‍ट्रवादीत प्रवेश करतानाच म्‍हटले हेाते, की तुम्‍ही ईडी लावाल तर मी सीडी काढेल आज खडसेंची भेट घेतली असून ते मुंबईकडे रवाना झाले असून, ईडीच्या नोटीसला ते निश्‍चितच सक्षमपणे उत्‍तर देतील; असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्‍त केला.

आपण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केल्याच्या लोढा यांच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही ते काही सभांमध्ये या पक्षांच्या नेत्यांसोबत दिसतात एवढेच त्यांच्याबाबतीत सांगता येईल गर्दीमध्ये कुणीही कुणासोबत दिसू शकतो त्यांना एवढे महत्व देण्याची गरज नाही त्यांचे संभाषण वकिलांच्या सल्ल्याने तपासणीला देऊन कायदेशीर कारवाई केली जाईल , असेही ते म्हणाले . .

Protected Content