पोकरा योजनेत उर्वरित गावांचा समावेश करा : खा. उन्मेष पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोकरा योजनेतील दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील उर्वरित गावांचा समावेश करावा अशी मागणी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली आहे.

शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी व शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये मोठा बदल करणारी योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा) योजना युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मराठवाडा, विदर्भ व खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात लागू केली होती. यामुळे एकट्या जळगाव जिल्ह्यातील ४६० गावांचा या योजनेत समावेश होवून हजारो शेतकरी बांधवांच्या जिवनात आर्थिक स्थैर्य लाभले. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठी मदत झाली. माञ या योजनेपासून वंचित गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने पोकरा योजनेपासून वंचित गावांना लाभ मिळण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ मध्ये समावेश करावा अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव (कृषि) तथा अध्यक्ष, पोकरा टप्पा -२ गाव निवड समिती यांच्या कडे केली आहे.

या बाबत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना निवेदन पत्र देऊन अपर मुख्य सचिव (कृषि) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे. आपल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नमुद केले आहे की शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी व शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये मोठा बदल करणारी योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा) योजना युती सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मराठवाडा, विदर्भ व खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात लागू केली होती. यामुळे एकट्या जळगाव जिल्ह्यातील ४६० गावांचा या योजनेत समावेश होवून हजारो शेतकरी बांधवांच्या जिवनात आर्थिक स्थैर्य लाभले. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठी मदत झाली. या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्याकरिता समाविष्ट करण्यात आलेले घटक व त्याची झालेली अंमलबजावणी शेतकर्‍यांकरिता अतिशय लाभदायक ठरलेली असून सदरील योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे जीवनमान व आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मोठी मदत झालेली आहे.

या अनुषंगाने आपण जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) टप्पा २ ही योजना मंजूर करून माझ्या जळगाव जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावांचा या योजनेत समावेश केल्यास शेतकर्‍यांना निश्चितपणे या योजनेच्या माध्यमातून मोठे लाभ होऊन आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने चालना मिळेल व शेतकर्‍यांना शेती क्षेत्रात काम करीत असताना शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने प्रत्येक गाव पातळीवर शेतकरी समाधानी होईल. अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, ना.अजित दादा पवार, कृषि मंत्री ना.धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तसेच याबाबत शासनाने ३० जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार नवीन गावाच्या निवड करतात स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा अप्पर मुख्य सचिव (कृषि) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे.

Protected Content