आमदारांच्या समर्थनार्थ चाळीसगावात मशाल पेटवून महावितरणचा निषेध

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या विरोधात शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करण्यात आला.  आ. मंगेश चव्हाण यांच्या समर्थनार्थ मशाली पेटविण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

 

तालुक्यातील सात हजार शेतीपंपाची  वीज महावितरणकडून खंडित करण्यात आल्याने आमदार मंगेश चव्हाण यांची शेतकऱ्यांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांनासोबत चर्चेदरम्यान चकमक झाली. त्यामुळे आमदारासह शेतकऱ्यांना पोलीसांनी अटक केली असताना तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पडसाद उमटत आहेत.

तालुक्यात २० मार्चरोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी हवालदिल असताना तालुक्यातील सात हजार शेतीपंपाचे वीज कनेक्शन  महावितरणकडून बील न भरण्याचे कारण सांगून खंडित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची व्यथा समजून आ. मंगेश चव्हाण काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन २६ मार्चरोजी सायंकाळी जळगाव येथे कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेले. मात्र आमदारांसह शेतकरी व अधिकारी यांच्या चर्चेदरम्यान चकमक झाल्याने आमदारांसह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे पडसाद म्हणून रात्री उशिरापर्यंत भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांचे वतीने या शेतकरी विरोधी सरकारचा व महावितरण कंपनीच्या विरोधात शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करण्यात आला.  आ. मंगेश चव्हाण यांच्या समर्थनार्थ मशाली पेटविण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

 

Protected Content