खिर्डी येथे विकासकामांचे भूमिपूजन.

 

 

 रावेर :प्रतिनिधी । तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे १५ व्या वित्त आयोगानंतर्गत दुर्गादेवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक व  क्रीडा निधी अंतर्गत व्यामशाळा या विकासकामांचे भूमिपूजन जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या वेळी येथील लोकनियुक्त सरपंच किरण कोळी, उपसरपंच वैशाली पाटील, ग्राम विकास अधिकारी व्ही. के. महाजन, सदस्य ज्ञानेश्वर जाधव, शमीम बी शेख  , विनोद महाजन, मोहिनी  नेमाडे, पंकज राणे, आशा पाटील, गंभीर पाटील , उशाबाई   तायडे, फरजाना बी शेख   , घनश्याम पाटील, किरण नेमाडे, सोनू पाटील, धीरज पाटील, अतुल पाटील, बाळू पाटील, शैलेश पाटील, सचिन पाटील, पप्पू मोरे आदीसह ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content