Home Cities जळगाव ‘आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातयं’ अशी सरकारची अवस्था-महाजनांची टीका

‘आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातयं’ अशी सरकारची अवस्था-महाजनांची टीका


मुंबई प्रतिनिधी । मंत्रीच बैठकांना दांडी मारत असल्याने ‘आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातयं’ अशी सरकारची अवस्था असल्याची टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीला मंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मंत्रीच बैठकांना दांडी मारत असल्याने ‘आंधळं दळतं अन् कुत्र पीठ खातयं’ अशी सरकारची अवस्था असल्याची टीका माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येत्या काही काळाता भाजप नेते पक्ष सोडणार असल्याचं म्हटलं होते. भाजपचा कोणताही नेता कुठेही जाणार नाही. अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्यावं,असा टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे. अण्णा हजारेंच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात केंद्रातील अधिकारी आणि केंद्रीय मंत्री यांची अण्णा हजारेंसोबत चर्चा घडवून आणणार आहे. अण्णा हजारेंनी वयाचा विचार करता उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असं गिरीश महाजन म्हणाले.


Protected Content

Play sound