गतीमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्यास अटक

jail

जळगाव प्रतिनिधी । मोताळा जि. बुलढाणा येथील गतीमंद महिलेवर अत्याचार प्रकरणीत फरार असलेला आरोपीला शहरातील वाघ नगरातून अटक केली असून पुढील कारवाईसाठी मोताळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, बोराखेडा परीसराती एका गावात राहणारी 45 वर्षीय गतीमंद महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी शांताराम रामकृष्ण गुंजकर रा.बुलढाणा यांच्या विरोधात बोराखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा पोलीस स्टेशनला गु.र.नं. 260/2019 भादवी कलम 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार होता. फरार आरोपी जळगावातील वाघ नगरात फिरत असल्याची गुप्त माहिती तालुका पोलीसांना मिळाल्यानंतर गुप्त सापळा रचुन संशयित शांतारामला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी मोताळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content