Home क्राईम आव्हाणे येथे बोरींगच्या केबलची चोरी

आव्हाणे येथे बोरींगच्या केबलची चोरी

0
41


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या बोरींगची ९ हजार रूपये किंमतीची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अव्हाणा येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची बालाजी नगरात असलेली बोरींगची ९ हजार रूपये किंमतीची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे १२ एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीला आले आहे. केबल प्रकरणी परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. आव्हाणा येथील ग्रामपंचायत कर्मचारी रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे. 


Protected Content

Play sound