Home क्राईम कालिंकामाता परिसरातून तरूणाच्या दुचाकीची चोरी

कालिंकामाता परिसरातून तरूणाच्या दुचाकीची चोरी

0
55
two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कालिंका माती परिसरातून मध्यरात्री १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पंकज वसंत माळी (वय-३२) रा. आनंद किरणा दुकान कालिंका माता मंदीर जळगाव हा तरूण पेंटरचे काम करून उदरनिर्वाह करतो. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एक्स ११२२) क्रमांकाची दुचाकी आहे. १४ एप्रिल रोजी काम करून घरी आले. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील रसवंतीसमोर पार्किंगला लावली होती. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी न मिळाल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. पंकज माळी यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भिला पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound