बँक खात्यात 70 लाखांची रक्कम वाटविली; गुन्ह्यात मुंबई ते जळगाव कनेक्शन

जळगाव प्रतिनिधी ।  मुंबईच्या एका उद्योजकाचे चेक बुक चोरुन त्यातील प्रत्येकी 35 लाख प्रमाणे दोन चेक असे 70 लाख रुपये वटविण्याचा प्रयत्न मुंबईच्या पोलिसांनी उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी मुंबईचे पोलीस पथक जळगावात धडकले. पथकाने संशयित म्हणून महेंद्र गणपत पाटील वय 35 रा. भुसावळ यांच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले आहे.  शहर पोलीस ठाण्यात पथकाची उशीरापर्यंत कारवाई सुरु होती.

असा समोर आला प्रकार
मुंबई परिसरात नागपाडा येथे जावेद ईस्माईल खत्री वय 88 हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. खत्री यांचे मुंबईतच एल.टी.मार्ग परिसरात अशोका शॉपिंग सेंटर म्हणून फर्म आहे. याठिकाणाहून मुंबई, कलकत्ता, इंदोर याठिकाणांहून माल मागविला जातो. व हा माल ओमान, दुबई व एमन या देशांमध्ये निर्यात केला जातो. या व्यवसायाच्या व्यवहारासाठी त्याचे इंडस् बँक हे खाते असून या खात्यावर व्यवसायाच्या संबंधित मालाचे पैसे घेणे देणे हे व्यवहार होत असतात. 17 रोजी खत्री यांना त्याच्या दुकानाच्या बँक खात्यावरुन प्रत्येकी 35 लाख रुपये दोन वेळा असे एकूण 70 लाख पूर्वेश एंटरप्रायजेसच्या खात्यावर जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. असा कुठलाही व्यवहार केला नसल्याने खत्री यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ त्यांची बँक गाठली. याठिकाणी व्यवस्थापकाला भेटल्यावर सदरचा प्रकार सांगितला. कोणत्या बँकेत जमा झाले हे तपासले असता, जळगाव शहरातील महावीर सहकारी बॅकेतील खात्यावर ते जमा झाल्याचे समोर आले.

बनावट स्वाक्षरी करुन खात्यावरुन पैसे वळविले
खत्री यांच्या कार्यालयातून अज्ञात व्यक्तीने चेक बुक गहाळ केले. यानंतर  प्रत्येक 35 लाख रुपये 451666 व 451669 या क्रमांकाचे दोन खत्री यांची हुबेहुब बनावट स्वाक्षरी करुन बॅकेत जमा करुन पूर्वेश एंटरप्रायजेसच्या जळगाव शहरातील महावीर सहकारी बॅकेच्या खात्यावर खत्री यांच्या खात्यातून 70 लाख रुपये वळते केल्याच्याबँकेच्या अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत समोर आले. यानंतर तेथील बँकेच्या व्यवस्थापकाने जळगावातील महावीर सहकारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फोनवरुन संपर्क साधला. ज्या खात्यावर 70 लाख रुपये वळते झाले, ते खाते गोठविण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार खाते गोठविण्यात आल्यानंतर खत्री यांनी सदरच्या प्रकाराबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

संशतियांसह दोघे चौकशीसाठी ताब्यात
आझाद नगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरविली. त्यानुसार ज्या खात्यात सदरचे 70 लाख रुपये हे जमा झाले, त्या पूर्वेश एंटरप्रायजेसच्या संबंधिताला निष्पन्न केले. त्यानुसार गुरुवारी आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजेंद्र धुरत, पोलीस नाईक एन.पी.पुरी व पोलीस शिपाई संदीप मावळे यांचे पथक जळगावात दाखल झाले. पथकाने महावीर बँकेतून माहिती घेवून संशयित महेंद्र पाटील यास ताब्यात घेतले. दरम्यान याप्रकरणात पैसे जमा करण्यासाठी आणखी एकाच्या खात्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र संबंधित तरुण उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने त्याच्यासह एकाला पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत पथकाने शहर पोलीस ठाणे गाठून नोंद केली आहे.

शक्कल लढविली मात्र पोलिसांनी हाणून पाडली
70 रुपये वळते करुन ते वळविण्याच्या प्रयत्नातील टोळीने एकाचवेळी 70 लाख रुपयांचा चेक न टाकता, दोन 35 लाख रुपये याप्रमाणे चेक खात्यात टाकले. 70 लाखांचा चेक टाकला असता, बँकेच्या नियमानुसार 70 लाख रुपये एवढी रक्कम एकाचवेळी खात्यातून वळवित असल्याने संबंधित खातेधारक म्हणजेच खत्री यांना बँकेचा फोन गेला असता. त्यामुळे शक्कल लढविण्यात येवून दोन वेगवेगळे चेक बनविण्यात येवून बनावट स्वाक्षरीच्या आधारावर महावीर बँकेच्या खात्यावर वळते करण्यात आले. मात्र मुंबई पोलिसांनी टोळीची शक्कल हाणून पाडली. पैसे खात्यात वळते झाले आहे, मात्र ते वटविण्यापूर्वीच पथकाने महेंद्र पाटील याच्यासह संशयितांना ताब्यात घेतले. खत्री यांचे ऑफिसमधून त्यांचे चेक नेमके चोरले कोणी, चेक जळगाव शहरातील पूर्वेश एंटरप्रायजेसच्या महावीर बँकेच्या खात्यावरच जमा करण्यात आले म्हणजे, या गुन्ह्याचे मुंबई ते जळगाव कनेक्शन कसे याचाही मुंबईच्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे.



Protected Content