काम पूर्ण करत ‘हा’ रस्ता मोकळा करावा – आम आदमी पार्टीची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काशिनाथ हॉटेल जवळील रस्त्याचे काम पूर्ण न केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. नागरीकांसाठी हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी करत आम आदमी पार्टीच्या वतीने महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील काशिनाथ लॉजजवळील रस्त्यावरील कामकाज अपूर्ण ठेवल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान करून महापालिकेच्या नाकर्तेपणाचा निषेध केला होता. तरी मनपाला काहीही फरक पडलेला नाही.

यासदर्भात आपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी, २७ एप्रिल रोजी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेवून यासंदर्भात तक्रार दिली. येत्या दोन दिवसांत तक्रारीच निराकरण न झाल्यास पुन्हा निर्णायक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी आप महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर,  मीडिया प्रमुख योगेश भोई, दुर्गेश निंबाळकर, हेमराज सोनावणे, भूषण कापडणीस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: