राजदेहरे येथील पिडीत कुटुंबाच्या मदतीला सरसावले मदतीचे हात

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील राजदेहरे येथील एका मजुर कुटूंबाच्या घराला अचानक आग लागल्याने घरच जळून खाक झाल्याची हद्यद्रावक घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती. त्यावर माजी वनमंत्री संजय राठोड यांनी लागलीच दखल घेऊन जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोच केली आहे.

तालुक्यातील राजदेहरे येथील वनिता बसराज चव्हाण हे कोरोनाच्या काळात आपल्या पतीला गमावल्यानंतर रोजंदारीवर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित आहे. त्यांना कु. अश्विनी चव्हाण, कु. निलेश चव्हाण व
कु. रोशनी चव्हाण असे तीन मुले आहेत. दरम्यान एका झोपडीत त्या वास्तव्याला होत्या. मात्र काळाने असा घाव घातला की, क्षणात होतेचे नव्हते झाले. अचानक गवताच्या झोपडीला आग लागल्याने घरच जळून खाग झाला. जगावं कसं असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांच्या मदतीला अनेक हात सरसावले आहेत. डॉ. तुषार राठोड यांनी सदर घटनेबाबत माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता. तातडीने सदर कुटुंबाला मदतीचे आवाहन केले. त्याअनुषंगाने किराणा व कपडे आदींची मदत करण्यात आली. दरम्यान आ. संजय राठोड यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून देणार असल्याचे डॉ. तुषार राठोड यांनी आश्वासित केले. तसेच अनेकांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content