मनसे जळगाव जिल्हा संघटक व तालुका अध्यक्षसह इतर पदाधिकाऱ्यांची निवड

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संभाजीनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बीड, जळगाव व औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी यांची संघटन बांधणी संदर्भात जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. यात निवड झालेल्या नवीन पदाधिकारी यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले.

काल राज्यातील औरंगाबाद येथे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाची बांधणी करण्यासाठी मनसे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व जनहित विधी विभागाचे राज्य अध्यक्ष अँड. किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बीड, जळगाव व औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी यांची संघटन बांधणी संदर्भात जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी पक्षासाठी केलेल्या उल्लेखनिय व लक्ष वेधणाऱ्या कार्याची दखल घेवुन त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी देऊन संपूर्ण जळगाव जिल्हा संघटकपदावर निवड करण्यात आली. त्याच बरोबर अजय तायडे यांना तीन तालुक्याची जबाबदारी देऊन जिल्हा उपसंघटक पदी निवड करण्यात आली. शहर अध्यक्षाची जबाबदारी सांभाळणारे किशोर नन्नवरे यांना तालुका अध्यक्ष संघटकपदी निवड करण्यात आली. विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी यांना शहराध्यक्ष संघटकपदी निवड करण्यात आली.

या ठिकाणी उपस्थित पक्षाचे जनहित विधी विभागाचे सरचिटणीस राकेश पेडणेकर, राज्य उपाध्यक्ष तुषार आगरकर, राज्य चिटणीस मोहनसिंग चव्हाण औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी हे बैठकीला उपस्थित होते. यावेळी निवड झालेल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी यांचे स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले..

Protected Content