श्री गणरायाला रावेर येथे शांततेत निरोप

रावेर, प्रतिनिधी । शहरातील गणेश भक्तांनी मोठ्या शांततेत भक्ती भावाने गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच नगर पालिकेने सार्वजनिक व खाजगी श्री गणेशाच्या मूर्तींचे संकलन करून विधीवत तापी नदीत विसर्जित केली.

रावेर शहरातील ११ सार्वजनिक व ९ खाजगी व ग्रामीण भागातील ११ सार्वजनिक व ११ खाजगी असे एकूण ४१ श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी ऍडिशनल एस.पी. भाग्यश्री नवटके, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत विसर्जन झालेले असून RAP प्लाटून दर्जाचे २ अधिकारी व ८० जवान,SRPF प्लाटूनचे २५ ,होमगार्ड ८७, RCP २७, रावेर पोलीस ४ अधिकारी ३५, कर्मचारी असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नगर पालिकेतर्फे ४ आयशर वाहन, अंबिका व्यायाम शाळा कडून १ ट्रॅक्टर, नगरसेवक राजू रामदास महाजन कडून १ ट्रॅक्टर असे गणपती मूर्ती संकलन करिता ठेण्यात आले होते. तहसीलदार उषाराणी देवगुणे, सीओ लांडे यांच्या प्रयत्नांतून शांततेत गणेश विसर्जन झाले आहे. शेवटी ऍडिशनल एसपी भाग्यश्री नवटके यांनी रावेर आठवडे बाजारात संकलन केलेले गणपती मूर्तीचे ४ आयशर वाहनातील गणपतीची आरती करण्यात आली व त्यानंतर सर्व वाहने निंभोरा सीम तापी नदी पुलाकडे विसर्जन करीत रवाना होऊन भक्तीभावात सर्व मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

Protected Content