LIVE स्पेशल; रावेर पंचायत समितीला दिपाली कोतवालांनी केले गतीमान

 

 

 

रावेर : प्रतिनिधी ।  रावेर पंचायत समितीला बऱ्याच वर्षानंतर कासवगतीने चालणा-या प्रशासनाला गती देण्यासाठी  कुशल प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल  लाभल्या आहेत

 

. तक्रारीचे निवारण असो की. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा विषय असो ; कोतवाल यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

 

सौ दिपाली कोतवाल रावेर पंचायत समितीला पाच महिन्यांपूर्वी लाभलेल्या बीडीओ.  अतिशय शांत स्वभावाच्या  व  कुशल प्रशासन चालवणा-या  सौ कोतवाल यांनी कमी-कालावधित रावेर तालुक्यातील बऱ्याच गावांना भेटी दिल्या आहेत .रावेर पंचायत समितीत ग्रामीण भागातुन तक्रार घेऊन आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीचे निवारण स्वता:च करतात   तक्रार आली तर  स्वता:   मुळापर्यंत  निवारण करतात

 

कासव गतीने चालणा-या पंचायत समितीला गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल आल्यापासुन  बरीच गती मिळाली आहे.कोरोना काळात देखिल ग्रामीण भागाची कामगिरी चांगली राहीली आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या घरकुल व शौचालय यावर विशेष लक्ष देऊन गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल आढावा घेत असतात.  कर्मचा-यांकडून कामे वेळेत करून घेतात

 

बीडीओ दिपाली कोतवाल यांचे भूमिहीन गरीब कुटुंब,  अपूर्ण घरकुले व  शौचालय नसलेले कुटुंब  यांच्यावर खास लक्ष असते कोरोनाकाळातदेखिल पंचायत समिती प्रशासनाची कामगिरी चांगली राहिली आहे.

Protected Content