दहीगावच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे अजय अडकमोल

 

 

यावल : प्रतिनिधी  । तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आज  सरपंच निवड करण्यात आली.  सरपंचपदी काँग्रेसचे अजय अडकमोल तर उपसरपंचपदी किशोर मधुकर महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

 

निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र इंगळे , त्यांचे  सहाय्यक ग्रामसेवक व्ही एल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणुक प्रक्रीया पार पडली    नुकत्याच झालेल्या  निवडणुकीत अनुसूचित जातीचे आरक्षण असल्याने व अनुसूचित जातीचा एकमेव उमेदवार निवडून आल्याने अजय अडकमोल हा २२ वर्षीय तरूण बिनविरोध सरपंचपदी विराजमान झाला आहे उपसरपंचपदि किशोर महाजन बिनविरोध निवडून आले

 

या विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला . पाच वर्षाच्या आगामी काळात सर्वच ग्रामपंचायत सदस्य हे सरपंच व उपसरपंच राहतील व गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असे आश्वासन नवनिर्वाचित सरपंच अजय अडकमोल यांनी दिले

 

याप्रसंगी भाजपाचे विजयी झालेले चारही उमेदवार अनुपस्थित होते   नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य  काँग्रेस राष्ट्रवादीच्या पल्लवी महाजन,  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सत्तार  तडवी ,  रजनी  बर्डे , आशाबाई  चौधरी ,  वंदना  चौधरी ,  मुमताजबी पठाण हे आठ सदस्य उपस्थित होते

राष्ट्रवादीचे गुलाब चौधरी , दिलीप चौधरी ,  ललित पाटील , अरुण पाटील ,  वजीर पठाण  जळगाव येथील वाय पठाण ,  किशोर अडकमोल ,  विजय बाविस्कर , कृष्णा पाटील , दिनकर फेगडे , उल्हास महाजन , करण महाजन , नरेंद्र महाजन यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

Protected Content