महाविकास आघाडी राज्यतील जनतेला दिलासा देणार का? – उपाध्ये

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्र सरकारने अबकारी कर कमी करीत इंधनाच्या दर कमी करत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार देखील इंधनाचे दर कमी करून राज्याच्य जनतेला दिलासा देणार का? असे ट्वीत करीत भाजपचे केशव उपाध्ये यांनी प्रश्न विचारला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढतेच असल्याने इंधनाचे दर वाढत होते. यावर केंद्र सरकारने पेट्रोल, डीझेलच्या अबकारी करात प्रत्येकी ८ आणि ६ रुपये प्रति लिटर दर कपात करण्याचा निर्णय घेतला. आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना इंधनाचा गॅसवर प्रत्येक सिलिंडर मागे २०० रुपये सबसिडी देण्याचे जाहीर करीत आतापर्यंत दोन वेळा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार राज्याने देखील पेट्रोल डीझेलचे दर किमान ५ ते ८ रुपये कमी करीत जनतेला द्यावा, अशी अपेक्षा असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

काही काळात प्लास्टिक आणि स्टील उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारले जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे.
मात्र केंद्राने दर कमी केले तर आपणही डीझेल पेट्रोल दर कमी करत जनतेला दिलासा द्यावा, हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रुचलेले नाही. केंद्राचे अधिकार आणि त्यावरून राज्य सरकार कोणते निर्णय घेऊ शकते, यावरून राज्याचे निष्क्रिय मुख्यमंत्र्यांचा पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. ते तिघाडी सरकर चालवत असताना कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत, परंतु या उद्वेगातुनच नेहमी पंतप्रधान आणि केंद्रावर टीका करीत असतात. किमान त्याच्या अखत्यारीत असलेल्या डीझेल पेट्रोल वरील दर काही रुपयांनी तरी कमी करून दाखवत सर्व सामान्यांना दिलासा द्या! असे ट्वीत करीत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Protected Content