गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेस नेत्याची खुली ‘ऑफर’ !

अहमदाबाद वृत्तसंस्था । गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे २० आमदार घेऊन आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी ऑफर काँग्रेस नेत्याने दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गुजरात विधानसभेत भाजपला काठावर बहुमत आहे. या पार्श्‍वभूमिवर, काही आमदारांची पक्षबदल हा सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पायउतार करू शकतो. या पार्श्‍वभूमिवर, काँग्रेस नेत्याची एक खुली ऑफर चर्चेचा विषय बनली आहे.

गुजरात विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही अनोखी बाब घडली. अमरेली जिल्ह्यातल्या लाठी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार विरजी ठुमरने यांनी सभागृहातच उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना वीस आमदारांसह काँग्रेसमध्ये येण्याची ऑफरच दिली. मतुम्ही २० आमदारांसह काँग्रेसमध्ये या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू,फ असं विरजी विधानसभेत म्हणाले. यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. मार्च अखेरीस होणार्‍या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, थेट उपमुख्यमंत्र्यांनाच दिलेली ऑफर ही राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली आहे.

Protected Content