मुक्ताईनगर शहरात पाणीपुरवठ्याची पुन्हा बोंबाबोंब !; नागरीकांचा संताप

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहराला लागून दोन नद्या असून देखील मुक्ताईनगर शहरात वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा खंडित होत असतो. वारंवार पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचे वांधे झालेले असताना.
ज्या ठिकाणी वारंवार नळ येत असतात त्या ठिकाणी पुन्हा नळाचे सुविधा चांगल्या प्रकारे सुरू असल्याने तेथील पाणी भरपूर प्रमाणात वाया जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मुक्ताईनगर शहर हे तालुक्याचे व नगरपंचायत असलेले शहर आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे २५ ते ३० हजार इतकी आहे. या ठिकाणी मुखत्वेकरून पाणीपुरवठा हा पूर्णा नदी पात्रावरून केला जातो. इतकेच नव्हे तर नवीन गावातील काही भागात कोथळी येथील विहिरीतून सुद्धा पाणीपुरवठा केला जातो. यातील बहुतेक भागांमध्ये महिना दीड महिन्यातून मोटार पंप जळणे, पाईपलाईन फुटणे अथवा नदीत गाळ आल्याने अशा विविध कारणांमुळे पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात, परंतु एकाच भागात पाणीपुरवठा वेळेवर केला जात नसल्याने व ही कारणे वारंवार सांगितली जात असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून भारतीय राज्यघटनेने सर्वांना बहाल केलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार पाहायला मिळत असल्याने नागरिकांतून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.

यासंदर्भात मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्याकडे सुद्धा पाणीपुरवठा संदर्भातील अनेक तक्रारी येत असून सुद्धा ते पाणीपुरवठा विभागाकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करण्याचे कारण काय पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर म्हणून धुरा सांभाळणारे शिपाई आहेत. सध्या त्यांच्यावर पाणीपुरवठ्याचा संपूर्ण भार नगरपंचायत प्रशासनातर्फे टाकण्यात आल्याचे समजते. पाणीपुरवठा विभाग सांभाळण्यासाठी इतर कर्मचारी नाहीत काय नगरपंचायत प्रशासनात प्रत्येक विभागात पूर्ण पदे भरलेले असताना ते या कामासाठी पात्र नाहीत काय असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत. एकाच वस्तीकडे पाणीपुरवठा होत असताना वारंवार पाईप फुटण्याचे प्रकार मोटार पंप जळण्याचे प्रकार का होतात? जर वारंवार असे प्रकार होत असतील तर त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरला आहे काय ? वारंवार मोटार पंप जळणे किंवा पाईप फुटणे हे केवळ खोटी बिले काढण्यासाठी तर ही कारणे सांगितले जात नसतील ना असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

एकीकडे एकाच वस्तीमध्ये पाणीपुरवठा करताना समस्या निर्माण होताना दिसून येतात त्यांना अपुरा व खंडित स्वरूपाचा वर्षभर पाणीपुरवठा केला जात असतो लोकांना प्यायला पाणी मिळत नाही.3 नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत तर दुसरीकडे मात्र शहरात चार ते पाच ठिकाणी सर्रासपणे नगरपंचायतच्या प्रशासनाच्या नाकावर टिचून वाशिंग सेंटर सुरू आहेत. त्या माध्यमातून दिवसातून हजारो लिटर पाणी वाहने धुवून वाया घातले जात आहे. सदर वॉशिंग सेंटर मात्र १२ महिने सुरूच असतात त्यामुळे नगरपंचायतच्या अजब कारभाराचा पुन्हा एक नमुना पाहायला मिळत आहे. नागरिकांना बिसलेरी युक्त पाणी देण्याचे राजकारण्यांकडून आश्वासित करण्यात आले होते. त्यावर आजपर्यंत कोट्यावधी रुपये खर्ची पडलेले आहेत. परंतु आजपर्यंत एक थेंब शुद्ध पाण्याचा प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. ही बाब राजकारणी विसरले असतील तरी नागरिक मात्र विसरू शकलेले नाहीत, कारण ही त्यांची मूलभूत गरज आहे. बिसलेरी युक्त पाणी तर सोडाच पण तिसऱ्या दिवशी देण्यात येणारे पाणी सुद्धा कायमस्वरूपी व पुरेसे पुरविण्यात नगरपंचायत प्रशासन ही सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनासह लोकप्रतिनिधी नागरिकांना पुरेसे व अखंडितपणे , शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना खरोखर राबवतील काय ? की शुद्ध पाणी , पुरेसे पाणी व नियमित पाणी मिळण्याचे नागरिकांचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील ? असे नागरिकातून एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

Protected Content