पत्रकार विजय पाटील यांचा स्तुत्य उपक्रम; लग्नपत्रिका, लग्नात मतदानाची शपथ घेऊन करणार जनजागृती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रत्येक तरुण हा आपला लग्न मोठ्या हौस मौजेत करत असतो व लग्न सोहळा नेहमी अविस्मरणीय राहावा यासाठी तो वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन करत असतो. अशाच प्रकारे जळगावातील धरणगाव तालुक्यातील सोनवद गावातील विजय पाटील या पत्रकार तरुणांनी आपल्या लग्न पत्रिकेतून तसेच लग्नात वऱ्हाडी मंडळीसह मतदानाची शपथ घेऊन मतदानाबद्दलची जनजागृती करणार आहे. त्यामुळे आजच्या तरुणांसमोर अनोखा आदर्श विजयने उभा केला आहे.

विजय पाटील यांचे ५ मे रोजी लग्न सोहळा पार पडत असून या लग्न सोहळ्याच्या पत्रिकेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा असा आशय पत्रिकेत नमूद केला आहे. त्यामुळे मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला विजय पाटील यांनी सुद्धा हातभार लावला असून मी सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक असल्याचा यातून सिद्ध केला आहे.

विजय पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच लग्न सोहळ्याच्या विजयाला शुभेच्छा दिल्या आहे. विजयच्या लग्न सोहळ्याच्या दिवशी सोहळ्याला उपस्थित सर्व वराडे मतदानाची शपथ घेतील असे सुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केला आहे.

Protected Content