खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रचारात मुलांसह माहेर प्रचारासाठी मैदानात !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघात दोन-तीन दिवसापासून प्रचाराची सुरवात झालेली असून, महायुती व भाजपा अधिकृत उमेदवार खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी मुलगी क्रिशिका व मुलगा गुरुनाथ व संपूर्ण माहेर प्रचाराच्या मैदानात उतरले आहे.

रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. या प्रचारासाठी प्रथमच आईच्या प्रचारासाठी मुंबई येथे शिक्षण घेणारा मुलगा गुरुनाथ व नुकतीच १० वी परीक्षा दिलेली व वैद्यकीय शिक्षणासाठी तयारी करत असलेली मुलगी क्रिशिका गावोगावी प्रचारात सहभागी होऊन आईसाठी मत मागत आहे. रक्षाताई खडसे यांचे शहादा तालुक्यातील खेड येथील माहेरातील त्यांचे आई-वडील, मोठे भाऊ, वाहिनी, भाची व चुलत भाऊ प्रचारासाठी नुकतेच मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात दाखल झालेले आहे. यंदाच्या निवडणुकीत माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे हे प्रत्यक्ष प्रचारात सहभागी नसले तरी, अप्रत्यक्षपणे ते रात्रीपर्यंत हितचिंतकांच्या भेटी घेत आहे. खा. रक्षाताई खडसे यांच्यासाठी सासर व माहेर संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पहावयास मिळत आहे.

Protected Content