धक्कादायक : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरूणांचा दुदैवी मृत्यू

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हृतिकेश मुरगु (वय-२३), सुहास कांबळे (वय-१९), युवराज हुली (वय-१८) तिघे रा. अंबरनाथ जि.ठाणे असे मयत झालेल्या तिघांची नावे आहेत.

मृतक हृतिकेश, सुहास, युवराज हे तिघं मित्र अंबरनाथ शहरातील घाडगेनगर तसंच जावसई परिसरात राहणारे होते. हे तिघंही आपल्या काही मित्रांसह मंगळवारी १ मे ला दुपारच्या सुमारास बदलापूर जवळील अस्नोली गावाजवळील बारवी नदीत पोहोण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी पाण्याचा अंदाज न आलयने एक मित्र बुडू लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला. दोघांनाही बुडताना पाहून तिसरा त्यांना वाचवण्यासाठी गेला. पण एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही नदीमध्ये बुडाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कुळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सायंकाळच्या सुमारास तिघांचे मृतदेह पोहणाऱ्यांच्या आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेहांना बदलापूर ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे घाडगेनगर आणि जावसई परिसरात शोककळा पसरली आहे.

Protected Content