आघाडी सरकार लाखो कोटींच्या भ्रष्टाचारात मग्न – आ. आकाश फुंडकर

शेगांव प्रतिनिधी । परंतु कित्येक महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही, आज फक्त मंदिर बंद आहे. हे आघाडी सरकार लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात मग्न आहे. परंतु या मंदिरावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबियांचा विचार सुध्दा नाही. दरम्यान, येत्या काही दिवसात मंदिर न उघडल्यास आम्ही स्वतः मंदिराचे दरवाजे उघडू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अॅड आकाश फुंडकर यांनी सांगितले.

आज राज्यात आघाडी सरकारमध्ये सहभागी तीन्ही पक्ष  दोन काँग्रेस आणि शिवसेना हे त्यांचे सर्व सत्काराचे कार्यक्रम राज्य भर राबवित आहेत.  यावेळी कोरोनाची लाट ओसरते,  आज संपुर्ण देशात सर्व मंदीरे सुरु आहेत.  परंतु आपल्या महाराष्ट्रात फक्त कोरोना लाट आहे म्हणून मंदीर बंद आहेत. हिंदु सण जवळ आले की, कोरोना  लाट येण्याची शक्यता वाढते, आकडे वाढतात हे सर्व कस होते हे संशोधनाचा विषय आहे.  परंतु आज सर्व मंदीरे बंद आहेत. मदिरालय, हॉटेल्स, वरली मटका, दारुचा पुर या महाराष्ट्रात वाहत आहे.  आज विविध कार्यक्रम होत आहेत. लग्नांमध्ये शेकडो लोग सहभागी होत आहेत.  परंतु मंदीराच दार उघडल की कोरोना वाढेल अशा या अजब गजब सरकारला असे अजब गजब निर्णय घ्यायला कोण भाग पाडते हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे हे सरकार वेळीच झोपेतून जागे झाले नाही व मंदीर उघडण्याचा निर्णय या सरकारने घेतला नाही तर आम्ही स्वत: मंदीराची दारे उघडू असे ही आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.

यावेळी बोलतांना मा.मंत्री आ.डॉ संजयजी कुटे म्हणाले की, या राज्यात कोरोनाच्या काळात सर्वात जास्त लोक मरण पावले. परंतु या सरकारच्या लेखी हे मुख्यमंत्री देशात सर्वात यशस्वी मुख्यमंत्री आहे.  आज देशभरातील इतर राज्य कोरोनाच्या दुस-या लाटीत रुग्ण संख्या वाढली म्हणेन त्यांनी त्यांच्या राज्यात निर्बध लावले होते.  परंतु आज त्या राज्यांमध्ये सर्व काही सुरळीत सुरु आहे.  या राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वांत अपयशी आहेत. आज  हे सरकार पुन्हा लॉकडाऊन लावायच्या तयारीत आहे.  त्यामुळे स्वत: काही करायचे नाही आणि लोकांना पण लॉकडाऊनच्या नावावर घरात बसवून ठेवायचे पण ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करायचे.  आज मंदीरावर अवलंबून अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत.  मागील दिड वर्षापासून त्यांचे सर्व व्यवहार बंद आहेत अशा लोकांच्या कुटूंबीयांनी काय करावे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे या सरकारने मंदीरे खुली करण्याचा तात्काळ निर्णय घ्यावा असे आ.डॉ संजय कुटे यावेळी म्हणाले.

कॅबिनेट मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजयजी कुटे, भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.आकाश दादा फुंडकरमा.आ.विजयराजे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प सीताराम जी ठोकळ महाराज, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, तालुकाध्यक्ष विजय भालतिडक यांच्या प्रमुख उपस्थितीत शंखनाद व घंटानांद आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व  सन्माननीय भाजपा  लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी,मंडल पदाधिकारी, जिल्हा व तालुका,शहर युवा मोर्चा,जिल्हा व तालुका,व शहर महिला आघाड्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य  व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content