जयदीप पाटीलची बोस्टन विद्यापीठात निवड

 पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो. से. हायस्कुल मधील दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी जयदीप पाटील याने पुणे येथे अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची एम. एस. या उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथील बोस्टन विद्यापीठात निवड झालेली आहे. 

तो ग. स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नवल पाटील यांचा मुलगा आहे. जय पाटील याचा संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. 

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग शालेय समिती चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधिर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे, ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख  एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर, ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. पाटील, भडगाव येथील माया देशमुख व विजय भोसले सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी त्याच्या यशाबद्दल कौतुक केले व पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Protected Content