बोदवडात भाजपाचे शंखनाद आंदोलन

बोदवड प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहराच्या वतीने आज बोदवड़ तालुक्यातील जागृत देवस्थान शिरसाळा मारोती मंदिर येथे मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलाएंगे ॥ हा नारा देत मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले.

महाआघाडी सरकारच्या हिंदुत्व विरोधी धोरणामुळे आज महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत त्यामुळे नाकर्त्या सरकारमुळे सर्व देव बंदिस्त झाले आहेत. या निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी तसेच देवा धर्माची मंदिरे बंद करून सातत्यानं अन्याय करून लाखो गोर गरिबांची उपवास करणाऱ्या अधर्मी आणि जुलमी ठाकरे सरकारला मंदिरे उघडण्याचा इशारा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहराच्या वतीने आज (दि ३० ऑगस्ट) सोमवार रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता बोदवड़ तालुक्यातील जागृत देवस्थान शिरसाळा मारोती मंदिर येथे मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलाएंगे ॥ हा नारा देत  शंखनाद आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात तालूका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी आंदोलनावेळी विषय मांडले की रावणाने देवाला बंदिस्त केले होते. तसेच कंसने देवाला बंदिस्त केले आहे व जेव्हा जेव्हा देव बाहेर आले आहे. त्यावेळी रावनाचा पण नाश झालाय आणि कंसाचा पण मग हे सरकार कोणत्या प्रवुत्ति किंवा भूमिकेच बनल आहे. यांना भीती तर वाटत नाही न रावण व कंसा सारख देव बाहेर येतील व आपल्या सरकारच विसर्जन होईल, या भीतीपोटी तर यांनी धार्मिक स्थळे बंद नाही. कारण आज सगळे जग उघडले आहे. महाराष्ट्र मध्ये सगळीकड़े एकत्रीकरणाचे कार्यक्रम चालू आहे. मग भाविक भक्तांच्या इच्छेवर का गदा आणतेय महावसुली सरकार त्यांच्या ईच्छेमध्ये का विघ्न आणतेय महाभकास सरकार नेमके हे सरकार कोणत्या प्रवुत्तिचे आहे. कंसाच्या की रावनाच्या की फक्त वसूली करण्याच्या हे त्यांनी स्पष्ट करावे.

आंदोलनावेळी भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकरभाऊ पाटिल, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, तालूका उपाध्यक्ष भागवतभाऊ चौधरी, विक्रमसिंग पाटिल, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव, भाजपा बोदवड़ शहराध्यक्ष नरेशभाऊ आहूजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भारतीय जनता पार्टिचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप घुले, संजय अग्रवाल, सुनील माळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, युवा मोर्चा ता. सरचिटणीस उमेश पाटिल, अभिषेक झाबक, भूषण देशमुख, राहुल माळी, जीवन माळी, भास्कर आव्हारे, मधुकर मूळतकर, मयूरेश शर्मा, सागर गंगतिरे, पंकज चांदुरकर  व असंख्य भाविक भक्तगण महिला व पुरुष उपस्थित होते.

 

Protected Content