जामनेरात अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी राजे हे धर्मवीर नसल्याचे वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका भाजपातर्फे नगरपालिका चौकात अजित पवार यांचा पुतळा दहन करून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते, असे खळबळजनक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखवल्या आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्र राज्यात उमटले आहे. या अनुषंगाने जामनेर शहरात भाजपाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. अजित पवार यांनी राज्यातील जनतेशी माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, नगरपालिका उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिष झाल्टे, बाबुराव नाजीम, सुहास हिवराळे, पंचायत समिती सदस्य गोपाल नाईक, अनिश शेख, पप्पू पाटील, दीपक तायडे, डॉ. संजीव पाटील, रामकिसन नाईक, बाळू चव्हाण, भाईदास चव्हाण, कैलास पालवे, सुभाष पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टी व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

 

Protected Content