आमदार लक्ष्मण जगताप कालवश

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पिंपरी चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज अखेरचा श्वास घेतला. जगताप यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार राहिले आहे. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी ३ ते ६ या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ वाजता त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे अंत्यविधी होणार आहे.

पिंपरी-चिंचवडचे अनभिषीक्त सम्राट म्हणून लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. १९८६ साली नगरसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. नंतर ते महापौर बनले. २००४ साली ते विधानपरिषदेवर निवडून गेले. तर, २०१४ आणि २०१९ साली ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून गेले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: