जळगाव शहर विकासासाठी 779 कोटींचा निधी आणला – आ.राजूमामा भोळे

bjp karyalay

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत 779 कोटी रूपयांचा निधी आणला. हा निधी केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार बहुमताने असल्यामुळे मिळाला असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपा कार्यालयात बोलतांना सांगितले. यावेळी महापौर सिमाताई भोळे, नगरसेवक सोनवणे आदी उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी ऐतिहासिक 779 कोटी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी माझ्या निधीसाठी पाठपुरावा केल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आलेल्या निधीतून अशी झाली कामे
1). विकासांतर्गत जळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या सर्व नवीन पाईप लाईन अमृत योजनेच्या पहिल्या यादीत 249 कोटी रूपये मंजूर करून कामाला सुरूवात करण्यात आली. 2). जळगाव शहरातील भुयारी व गटार (मलनिस्सारण) योजनेसाठी केंद्रातून 191 कोटी निधी मंजूर झाला असून या कामासाठी निवीदा मागविण्यात आल्या आहेत. 3). सुवर्ण जयंती नगरोथ्थान अभियानांतर्गत मुख्यंमत्री यांनी 100 कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली असून निधी मंजूरीसाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला असून लवकरच तो मंजूर करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहरातील रस्ते, गटारी, मुख्य पिण्याची पाईपलाईन वॉल आदी कामे होणार आहे. 4). समांतर रस्त्यासाठी 69 कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध झाला. 5). जळगाव शहरातील पोलीसांसाठी वसाहतीसाठी राज्य शासनाकडून 70 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला. 6). राज्य शासनाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलासाठी 35 कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. यांच्यासह आदी कामांना लवकरच मंजूरी मिळणार असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली.

 

Protected Content