Home Cities चाळीसगाव रोटरी पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

रोटरी पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

0
108
rotari padgrahan
rotari padgrahan

rotari padgrahan

चाळीसगाव प्रतिनिधी । येथे रोटरी पदग्रहण सोहळा (दि. 4 जुलै) रोजी आयोजित करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, येथे मुंबई रोटरीचे माजी प्रांतपाल गोपाल मंधानिया व सहाय्यक प्रांतपाल डॉ. राहुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत रोटरीचे नूतन अध्यक्ष म्हणून डॉ. संदीपजी देशमुख यांच्या कडे रोटरीचे चार्टर सोपविण्यात आले. त्याच प्रसंगी नूतन सचिव म्हणून रोशन ताथेड तसेच रोटरी मिलेनियमचे नूतन अध्यक्ष म्हणून संदीप जैन व नूतन सचिव म्हणून डॉ. गजेंद्र आहिरराव व रोटरॅक्ट क्लब ऑफ़ क्लासिकच्या अध्यक्ष म्हणून आकाश पोळ व् रोटरॅक्ट क्लब ऑफ़ इलाईटच्या अध्यक्ष पदी प्रविण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तीन नविन रोटरी कम्युनिटी कॉर्पसची स्थापना करण्यात आली. त्यात प्रिंप्री, चितेगांव व गणेशपुर यांचा समावेश आहे. याप्रसंगी रोटरीचे मावळते पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रोटरी परिवार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound