अपात्रतेतून वाचण्यासाठी ‘त्या’ नगरसेवकांचे पक्षांतर : खडसे (Video)

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । शिवसेनेमध्ये फक्त पाच नगरसेवक गेले असून अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. मात्र त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई अटळ असल्याचा इशारा आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या दहा नगरसेवकांनी शिवबंधन बांधल्याचे वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात सहा नगरसेवकांनी आज प्रवेश घेतला असून उर्वरित चौघे हे उद्या प्रवेश करणार असल्याची माहिती आज देण्यात आली.

यानंतर एकनाथरा खडसे यांनी आपल्या फार्म हाऊसवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुक्ताईनगरचे चार नगरसेवक व एक नगरसेविका यांच्यावर आधीच अपात्रतेची कारवाई सुरू आहे. यातील नगरसेवकांनी अतिक्रमण केले असून नगरसेविका जास्त अपत्यांमुळे अडचणीत आल्या आहेत. या सर्वांना अपात्रतेच्या कारवाईतून वाचविण्याचे आमीष दाखविण्यात आले असल्याचे एकनाथराव खडसे म्हणाले.

दरम्यान, संबंधीत नगरसेवक हे अपात्रतेतून वाचण्याच्या आमिषामुळे शिवसेनेत गेले असून त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. माझ्या समोर मुक्ताईनगरचे नऊ नगरसेवक बसलेले असून यामुळे शिवसेनेत गेले तरी कोण ? असा प्रश्‍न माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी विचारला. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पक्षांतर करणार्‍यांवर कायद्यानुसार कारवाई करतीलच असा इशारा देखील एकनाथराव खडसे यांनी याप्रसंगी दिली.

खालील व्हिडीओत पहा एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/161126965989103

Protected Content