जिल्ह्यास मिळाला लस साठा; उद्या होणार लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यास लसींचा साठा प्राप्त झाला असून उद्या अर्थात गुरूवारी लसीकरण होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग सातत्याने कमी-जास्त होत आहे. लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याने याच्या वाटपाचे नियोजन करण्यात देखील अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, आज दुपारी जिल्ह्यात लसींचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे उद्या गुरूवार दिनांक २७ मे रोजी जिल्हाभरातील लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. यात कोविशिल्डच्या लसींचा साठा मिळाला असून ४५ वर्षांवरील व्यक्तींना पहिल्या डोससाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

: जामनेर ३००, डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेज ४०,चाेपडा २००, मुक्ताईनगर ३००, चाळीसगाव १००, पाराेळा २००, अमळनेर १००, पाचाेरा १५०, रावेर ४००, यावल १००, भडगाव २००,बाेदवड २००, एरंडाेल ३००, भुसावळ रेल्वे हाॅस्पिटल ४००,धरणगाव ३००, भुसावळ (खडका राेड) १००, बद्री प्लाट भुसावळ २००, पाल १००, पिंपळगाव १००, पहुर १००, झामी चाैक, अमळनेर ३००, न्हावी २००, सावदा ३२०, वरणगाव १००, मेहुणबारे १००, अमळगाव, अमळनेर १००, अाॅर्डनस फॅक्टरी १३०, एनयुएचएम पाचाेरा १५०, एनयुएचएम चाेपडा १००, चाळीसगाव एनयुएचएम १००, फैजपूर १०० सर्व प्राथमिक अाराेग्य केंद्र -६१६०, असा साठा उपलब्ध होणार आहे.

जळगाव शहराचा विचार केला असता छत्रपती शाहू महाराज रूग्णालय, डी. बी. जैन हॉस्पीटल, शिवाजीनगर;नानीबाई हॉस्पीटल, मुलतानी हॉस्पीटल, शाहीर अमर शेख हॉस्पीटल, कुंभार वाडा; चेतनदास मेहता हॉस्पीटल, स्वाध्याय भवन, मनपा शाळा क्रमांक-४८; आणि रेडक्रॉस सोसायटी या ठिकाणी लसीकरण सुरू राहणार आहे. तर जिल्ह्यात उपलब्धतेनुसार ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पहिल्या डोससाठी लसीकरण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Protected Content