अखेर गिरीशभाऊंनी मागितली माफी ! : ‘हे’ आहे कारण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून अखेर ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे.

पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ग्रामविकास तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरून त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन जोरदार टिकास्त्र सोडले होते.

दरम्यान, हा वाद चिघळण्याच्या आधीच ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असे म्हणत गिरीश महाजन यामध्ये राजकारण करू नये असेही म्हंटले आहे. महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठेही हेतू नव्हता, मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे हे सर्वांना माहिती आहे, शेवटी महाराज हे महाराज आहेत. महाराजांच्या नावाचा माझ्याकडुन अनवधानाने एकेरी उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो असं गिरीश महाजन यांनी म्हणत माफी मागितली. याबाबत टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.

Protected Content