मु.जे. महाविद्यालयात आत्मिक सौंदर्याचा अविष्कार भावयात्रा कार्यक्रम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र द्वारा निर्मित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) व शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेम,पूजा,प्रार्थना व प्रसाद यांच्या आत्मिक सौंदर्याचा अविष्कार भावयात्रा हा अभिनव कार्यक्रम जुना कॉन्फरन्स हॉल येथे सादर झाला.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते के.सी.ई.सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर व इशा वडोदकर यांनी सादर केला. प्रेमाचे तीन भाग एक वस्तूंवरील, व्यक्तिवरील, आणि भगवतावरील प्रेम याचा सुंदर मिलाफ त्यानंतर पुजा त्याचे भौतिक जगात मान्य पुजा. पुजा प्रदर्शनाची वस्तु नाही.प्रार्थना हि आत्मानुभूती आहे. ती व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अभंग भाग आहे.त्यानंतर प्रसाद मिळतो.प्रसाद म्हणजे प्रतिसाद आहे.जो पुर्णत्व जगण्याला देतो. असा भावविभोर कार्यक्रम संपन्न झाला.

रंगमंच व्यवस्थापन मिलन भामरे,पियुष बडगुजर तर संगीत कपिल शिंगाणे,देवेंद्र गुरव, रंगभूषा योगेश शुक्ल यांनी केले.यावेळी के.सी.ई.सोसायटीचे अॅड प्रमोद पाटील, कोषाध्याक्ष डी.टी.पाटील, श्री.झोपे. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, शिल्पा बेंडाळे, रेखा पाटील, धनश्री फालक, प्रा.केतन चौधरी, प्रा.निलेश जोशी, संजीव पाटील, श्रीकृष्ण बेलोरकर, सुभाष तळेले, प्रसाद देसाई, अमोल देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी केले.

Protected Content