भर रस्त्यावर बंद पडले अवजड वाहन : वाहतुकीची कोंडी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर भर रस्त्यात भले मोठे अवजड वाहन बंद पडल्याने दोन्ही बाजूकडून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मलकापूर कडून येणार्‍या कंपनीचे भले मोठे कंटेनर सर्विस रोडला बंद पडल्यामुळे येणार्‍या गाड्यांची चांगली तारांबळ उडाली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, ऐन सणासुदीच्या दिवसात गाड्यांना परत चार किलोमीटर मागे जाऊन परत गाडी पलटवून आणावी लागत आहे. यामुळे पोलिसांनी तात्काळ या समस्येचे निराकरण करण्याची मागणी होत आहे.

Protected Content