पार्कींगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर कमलाकर सोनार (वय-५४) रा. गायत्री नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता मनोहर सोनार हे आपल्या कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएस २९५१) ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पुतळ्याजवळ पार्क करून लावलेली होती. अज्ञात चोरट्याने ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

Protected Content