पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर बसस्थानक परिसरात अनोळखी वृध्द व्यक्तीचे आज निधन झाले असून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार, ते पाच महिन्यांपासून पहूर बसस्थानक परिसरात अज्ञात वृध्द राहत होते. सदर वृध्द हे निस्वार्थी व अतिशय स्वाभिमानी होते.कुणी चहा जरी दिला तरी ते कधीच घेत नव्हते तर गेल्या पाच महिन्यांत कुलाही साधा एक रूपया सुध्दा मागीतला नाही, अशा निस्वार्थी, व स्वाभिमानी अज्ञात वृध्दाचा आज सकाळी निधन झाले. येथील ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांनी सरपंचपती रामेश्वर पाटील यांना सदर घटनेबाबत माहिती दिली. सरपंच सौ. निताताई पाटील उपसरपंच शाम सावळे यांच्या मदतीने व पहूर पेठ ग्रामपंचायतीचे सहकार्याने तात्काळ अंत्यविधी चे सर्व सामान आणुन ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरवर त्या वृध्दाचे प्रेत ठेवून स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याअगोदरही पत्रकारांच्या मागणी नुसार पहूर पेठ ग्रामपंचायत च्या माध्यमातून अशा अनेक अडचणी त्यांनी सोडविल्या आहेत. याचे ज्वलंत उदाहरण द्यायचे म्हटल्यास पहूर येथील बसस्थानक परिसरात अज्ञात बेवारस वृध्दाचे आज निधन झाले मृतदेह ट्रेक्टरवर ठेवून शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत सोशल डिस्टिंग चे पालन करीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सरपंचपती रामेश्वर पाटील, उपसरपंच राजू जाधव, शरद नरवाडे, पहूर पोलीस स्टेशनचे,संतोष चौधरी, श्रीराम धुमाळ, ढाकरे, ईश्वर देशमुख यांनी सहकार्य केले. यावरून आजही माणूसकीचा झरा कायम असल्याचे या सर्वानी दाखवून दिले.