चोपड्यात उद्यापासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताह

sawata maharaj

चोपडा प्रतिनिधी । येथील श्री फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव यांच्यावतीने सालाबादप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह २७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. दररोज पहाटे ५ ते ६ वाजे दरम्यान काकड आरती होणार आहे. रोज रात्री ८ ते १० वाजेपर्यंत कीर्तन होणार आहे. २७ जुले रोजी सकाळी ९ वाजता स्थापना, पूजा, व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प.सावता महाराज मोहाडी यांचे कीर्तन तर २८ जुलै रोजी ह.भ.प. सविताताई महाराज चाळीसगाव यांचे कीर्तन होणार आहे. २९ जुलै रोजी संध्या. ५ वाजता समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात येणार आहे. ह. भ.प.रमेश महाराज, टाकळी यांचे कीर्तन ३० जुलै रोजी ह.भ.प.भावेश महाराज, विटनेर यांचे तर ३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता काल्याचे कीर्तन व सप्ताह समाप्ती कार्यक्रम होणार आहे दुपारी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पालखी सोहळा व मिरवणूक ,समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे.

यांचे लाभणार सहकार्य
कार्यक्रम श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंगल कार्यालयात होणार आहे. कीर्तन सप्ताहात मृदूगाचार्य म्हणून ह.भ.प.महेश महाराज, (कठोरा, किनोद), गायनाचार्य म्हणून ह.भ.प.राजेंद्र महाराज ,(पळासखेडा), ह.भ.प. बळीराम महाराज (शहापूर), विणेकरी म्हणून ह.भ.प.आधार महाराज (अंबाडे) ह.भ.प.भूषण महाराज, (अंबाडे), हे राहणार आहेत. यासाठी वेले, चहार्डी, चुंचाळे, गोरगावले, अकुलखेडा, आडगाव, अंबाडे, येथील भजनी मंडळे सहकार्य करणार आहेत . कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळाचे अध्यक्ष – नारायण बापू महाजन, उपाध्यक्ष – पुंडलिक दिपचंद माळी, सचिव – सी.बी.माळी सर खजिनदार – दगडू यादव महाजन आणि सर्व समाज बांधवांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील नवयुवक मंडळ मेहनत घेणार आहेत.

Protected Content