पिंप्री खुर्द येथे ‘कायदेविषयक शिबीर’ उत्साहात

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धरणगाव न्यायालय व वकिल संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतच्या राममंदिर सभागृहात ‘कायदेविषयक शिबीर’ उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धरणगाव न्यायालायचे न्यायाधीश एस.डी.सावरकर साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणुन वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.बी.के.आवरे, सरपंच सरलाबाई बडगुजर उपसरपंच, मंगल आण्णा पाटील, वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. संदिप सुतारे, ॲड.डी.ए.माळी, ॲड.गजानन पाटील, ॲड.सी.झेड.कट्यारे, ॲड. संदिप पाटील, ॲड.महेंद्र चौधरी, ॲड.प्रशांत क्षत्रिय, अँड.व्ही.एस.भोलाणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी ॲड.महेंद्र चौधरी यांनी जमीन वाटणी बाबत मार्गदर्शन केले तसेच ॲड. गजानन पाटील यांनी सातबारा उतारा व वहिवाट कायदा तसेच  FIR बाबतीत फौजदारी कायदा यावर मार्गदर्शन केले व सखोल अशी माहिती देत भारतीय राज्यघटनेचा मूलभूत संदेश काय आहे यावर प्रकाशझोत टाकला.

धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी. सावरकर यांनी वरील विषयास अनुसरून सखोल माहिती आपल्या मार्गदर्शनात ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामसेवक, सुनील बोरसे, ग्रामपंचायत सदस्य, शांताराम बडगुजर, डी.बी.मनुरे सर, कमलबाई धोबी, अनुसयाबाई सोनवणे, शांताराम मोरे, सरलाबाई लोखंडे, रुकसाना खाटीक, छाया मोहकर, ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस पाटील गोपाल बडगुजर, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष सोनवणे, निलेश बडगुजर, तुषार चौधरी आदी उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक मनोज शर्मा, देविदास चौधरी ,शांताराम मोहकार, फुलचंद चौधरी, बालु शर्मा, प्रकाश लोखंडे, ईश्वर धोबी, शिवा महाजन, मोहन शिंदे, बाळू चौधरी, भरत शिंपी, सिराज खाटीक, शंकर बडगुजर, संतोष पांडे, सतिश शिंदे व पिंपरी गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटचे पुष्प ॲड.गजानन पाटील यांनी गुंफले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायलयीन अधिक्षक सैंदाणे व गणेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content