आदर्श शिक्षक स्व. वा. पाटील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आ.कुटे यांच्या हस्ते!

शेगांव, प्रतिनिधी| पहिला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व. वा. ओ. पाटील यांच्या नावे न.पा.द्वारे प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यात पहिला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करून जिल्ह्यासह गावाचे नाव उंचावणारे आदर्श शिक्षक स्व. वा.ओ. पाटील यांच्या नावे न.पा.द्वारे प्रवेशद्वार बांधण्यात  येत आहे. सदर कमानाचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते २४ आक्टोंबर रोजी विविध ठिकाणी लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. मोदी नगर मधील जय तुळजा भवानी मंडळाची कमान व स्वर्गीय वा.ओ पाटील यांच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच जय तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्थेला व्यायाम शाळेचे साहित्य देण्यात आले. दरम्यान  आदर्श शिक्षक स्व. वा. ओ. पाटील यांच्या कमानाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत असल्याने मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी केले. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे , प्रमुख पाहुणे रविकांत पाटील ,नगराध्यक्ष शकुंतला बुच, भाजप गटनेते शरद अग्रवाल, भाजप नेते पांडुरंग बुच, नितीन शेगोकार ,शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे ,डॉ. मोहन बानोले, डॉ. रवी कराळे, नगरसेवक शैलेश पटोकार ,रवींद्र रायने, विजय लांजुळकर, समीर मोरे ,रोहित धाराशिवकर, संदीप काळे ,जय तुळजाभवानी मंडळाचे अध्यक्ष रवी उमाळे, केशव लांजुळकर, कैलास नवल कार ,भूषण मापारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी गेल्या निवडणुकीच्या वेळी मोदीनगर वाशियाना विकासाचे वचन दिलेला शब्द आज पूर्ण होत असल्याची ग्वाही भाजप नेते पांडुरंग बुच यांनी दिली.

Protected Content