भुसावळच्या ताप्ती स्कुलमधील दोन दिवशीय सेमीनारचा समारोप

भुसावळ – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी |येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित दोन दिवसीय सेमीनारचा समारोप आज केरला येथील डॉ. जयराम नायर यांच्या मार्गदर्शनाने झाला.

भुसावळ येथील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये दोन दिवशीय सेमीनारचे आयोजन ८ जून पासून करण्यात आले होते. हो
पहिल्या दिवशी गुजरातच्या श्रेया ललवाणी यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर आज शुक्रवार ९ जून रोजी केरला येथील डॉ. जयराम नायर यांच्या मार्गदर्शनाने समारोप झाला. सकाळी साडे आठ ते एक वाजेपर्यंत शाळेतील शिक्षकांसाठी हे सेमिनार ठेवण्यात आले होते. या सेमीनारच्या समारोप प्रसंगी केरळ येथील डॉ. जयराम नायर यांनी ताप्ती पब्लीक सीबीएसई स्कुल च्या शिक्षकांना नॅशनल एज्युकेशन पॉलीसी अंर्तगत विविध विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शनात सांगीतले की, शालेय शिक्षण पद्धतीच्या पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र, सर्वसमावेशक शिक्षण पद्धती अशा विवीध विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. तर डॉ. जयराम नायर यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रिंसिपल निना कटलर यांच्या सह शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाळेच्या प्रा. निना कटलर यांच्यासह सोनाली मुजूमदार, स्मिता जाधव, मनप्रित कौर, ऍनेट मॅथ्यू, हर्षला चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार सोफीया पीबॉडी यांनी मानले.

Protected Content