महाविद्यालयाने विद्यार्थ्यांवर लावलेली गणवेश शक्ती त्वरीत रद्द करावी; अन्यथा मनसे आंदोलन करणार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना केलेली गणवेश सक्ती रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्या संध्या सोनवणे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. ही गणवेश त्वरीत बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येइल असा इशारा दिली आहे.

यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल येथे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणाऱ्या परिक्षेत गणवेश नसलेल्या विद्यार्थ्यांना बसु न देणे हे चुकीचे आहे. यावल तालुक्यातील राहणारे बहुसंख्य नागरिक हे मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे असुन अशा परिस्थितीत पाल्यांना आपल्या मुला, मुलींना गणवेश हे परवडणारे नसुन अशा परिस्थितीत महाविद्यालयाच्या वतीने त्यांना प्रवेश न देणे किवां त्यांना परिक्षा पासुन वंचित ठेवणे हे चुकीचे आहे. तरी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांवर परिक्षा तोंडा आती असता गणवेशाची केलेली सक्ती त्वरीत रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, मनसेचे तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेन्द्र पवार, उपजिल्हा संघटक अजय तायडे, यावल शहराध्यक्ष गौरव कोळी यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

Protected Content