शरद पवारांच्या गटाला मिळाले ‘हे’ नवे नाव

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे. त्यानुसार, निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं असणार आहे.

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात हे नाव शरद पवार यांच्या गटाला देण्यात आलं आहे. या निवडणुकीसाठी पक्ष चिन्हाची गरज नसते त्यामुळं चिन्हावर निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. त्यामुळं शरद पवार गटाला दिलेलं हे नवं नाव हे राज्यसभा निवडणूक होईपर्यंत अर्थात 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध असणार आहे.

Protected Content