मु. जे. महाविद्याल्यात स्नेहसंमेलन निमित्त विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या रंगताय वेशभूषा स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन चैतन्य २०२४ चे आयोजन दिनांक ९ व १० फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलेले आहे. या स्नेहसंमेलनात विविध कला प्रकारांसाठी 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दि. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान विविध वेशभूषा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि. ६ रोजी पारंपरिक वेशभूषेसह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सावित्रीबाई फुले,महात्मा फुले, डॉ.आनंदीबाई जोशी, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आदिवासी समाजातील वेशभूषेसह महाविद्यालयीन परिसरात समाज सुधारकांच्या वेशभूषेत उपस्थित होते.

या तीनदिवसीय स्पर्धेत ३८० विद्यार्थी, ७८ शिक्षक व ४० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेचे परीक्षण मान्यवर परीक्षकांद्वारे करण्यात येत आहे. दि.७ रोजी साडी डे, मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी बॉलीवूड डे साजरा केला. दि. ८ रोजी समूह वेशभूषेत विविध राज्यांची वेशभूषा (सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनपर) साजरे करणार आहे. दिनांक ९ रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व १० रोजी पारितोषिक वितरण समारोप समारंभ होणार आहे. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनप्रमुख डॉ. संगीता पाटील, विविध समितीप्रमुख, समिती सदस्य व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Protected Content