शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचली ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना झाली असून आज आमचा पक्ष दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनी पत्रकारांशी ते बोलत होते.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, भूमीपुत्रांची जी भूमिका होती ती भूमिका घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. आणि तीच भूमिका घेऊन देशभरात प्रादेशिक पक्षांची स्थापना झाली. याच प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवर देश उभा आहे. याचं श्रेय शिवसेनेला द्यावं लागेल. आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, देशभरात शिवसेना हिंदुच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहे, आणि वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर आज पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. ते काय बोलतील याच्याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. तसेच कोणताही राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही ही ताकद प्रादेशिक पक्षांची आहे. आणि शिवसेनेला याचं सर्व श्रेय जाते. शिवसेनेचे अबतक छप्पन असले तरी आम्ही पुढे जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी नमूद केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: