कंटेनर-रिक्षाच्या अपघातात महिला ठार; दोन जखमी

नाशिक-वृत्तसेवा | नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी गावाजवळ शुक्रवारी (ता. २२) दुपारी कंटेनर आणि रिक्षामधील अपघातात ब्राह्मणवाडेच्या महिला ठार झाल्या आहेत. शिवाजी रामराजे हे सिन्नर येथून शिंदे मार्गे ब्राह्मणवाडे येथे रिक्षाने जात असताना महामार्गावर भरधाव वेगातील कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर रिक्षावर कोसळला. रिक्षामधील मंदाकिनी बाळासाहेब रामराजे (५५, रा. ब्राम्हणवाडे, ता. सिन्नर) या ठार झाल्या आहेत.

श्री. रामराजे (५२) आणि आशा विजय रामराजे (५२, दोघे रा. ब्राम्हणवाडे) हे जखमी झाले आहेत. श्री. रामराजे यांच्या डोक्याला मार लागला असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आशा रामराजे किरकोळ जखमी झाल्या असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

रिक्षा (एमएच १५ जेए २०६४) आणि कंटेनर (एमएच ४६ एफ १२०९) हे सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने जात होते. एका वाहनाला ओलांडण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती समजताच, पोलिसांनी मदत कार्य करीत जखमींना रुग्णालयात हलविले. एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

Protected Content