पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयात ‘कायदेविषयक शिबीर’ उत्साहात

 

पाचोरा प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशानुसार स्वातंत्र अमृत महोत्सवानिमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आऊटरिच प्रोग्राम” चे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज (दि. २६) रोजी तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील भडगाव रोडवरील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात ‘कायदे विषयक’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये रॅगिंग आणि लोकोपयोगी सेवा विषयी कायदेविषयक दिल्या जाणाऱ्या सेवा हा होता. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव विलास जोशी हे अध्यक्ष स्थानी होते.

शिबिराच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील यांनी केले. त्यानंतर अॅड. एस. पी. पाटील यांनी रॅगिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे कसे नुकसान होते याविषयी सांगितले.

यानंतर सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी लोकोपयोगी सेवा याविषयी बोलतांना केंद्रीय व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी मंचावर अॅड. एस. बी. माहेश्वरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपस्थित होते.

यावेळी अॅड. मनीषा पवार, तालुका विधी सेवा समितीचे अमित दायमा, दिपक तायडे, सचिन राजपूत उपस्थित होते. शेवटी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपस्थितीत मान्यवरांचे विलास जोशी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन कर्मचारी, प्राध्यापक वृंद, विधी शाखेचे विद्यार्थी वृषभ पाटील, अनम शेख, भाग्यश्री महालपुरे, चंचल पाटील, तालुका वकील संघ, आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content